तुळजापुर, दि. ०७ : शिवसेना जिल्हा उस्मानाबाद यांच्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर व उस्मानाबाद-कळंब विधानसभेचे आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.७ गुरुवार रोजी आनंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख सतिष सोमाणी व तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,तुळजापुर शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या सूचनेनुसार हंगरगा(तुळ)गावामध्ये २५ ते २५ गरजुना जिवना आवश्यक वस्तुचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
सध्या लाॅकडाउन मुळे सध्या कामं बंद आहेत. लोक घरातचं असल्याने सर्वसामान्य असलेल्या ग्रामीण भागातील लोकांचे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर होत चालला होता. ही समस्या लक्षात घेऊन गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य किराणाचे वाटप करण्यात आले.या अन्नधान्य किट मिळाल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी तुळजापूर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणची एक ही चुल अन्नधान्या मुळे बंद राहणार नाही असे मत आनंदी प्रतिष्टाण चे अध्यक्ष सतिषकुमार सोमाणी यांनी व्यक्त केले.

