काटी, दि. 20 :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक जालिंदर गणपतराव देशमुख वय (90) यांचे मंगळवार दि.(19) रोजी संध्याकाळी 9:30 वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री 12:30 वाजता सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव तर प्राचार्य जयसिंगराव देशमुख व प्रा.अमरसिंह देशमुख यांचे बंधू होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.
