![]() |
| अनिल मोरे, कलाकार महासंघ संस्थापक अध्यक्ष |
काटी : उमाजी गायकवाड
कोरोना विषाणूमुळे देशभरात थैमान घातले आहे. सध्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्व सोहळे रद्द करण्यात आले आहेत. यंदाचा लग्नसराईचा हंगाम संपत आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील बॅण्डपथकातील कलाकारासह विविध क्षेत्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील 14 ते 15 वर्षांपासून कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून लॉकडाऊन संपेपर्यंत कलाकारांना महिना पाच हजार रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मा.ना. अजित पवार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मा.ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आले.
कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना कलाकारांच्या न्याय हक्कासाठी शाषणदरबारी प्रामाणिकपणे लढा देत आहे संघटनेने आतापर्यंत मोर्चे, आंदोलने,रास्ता रोको, आत्मदहनाचे इशारे व निवेदन देऊन कलाकारांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. गेल्या वर्षभरापासून कलाकारांच्या वर अनेक संकटे येवून गेली त्यामध्ये महापूर, आचार संहिता आणि आता जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. देशांचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली आणि महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा ,लग्न समारंभ सर्वच कार्यक्रम बंद झाले त्यामुळे कलाकारांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने 12 एप्रिल रोजी मा मुख्यमंत्री उदधवरावजी ठाकरे, मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सांस्कृतिक मंत्री मा.अमित देशमुख, मा.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून महाराष्ट्रातील कलाकार कशा पद्धतीने जगत आहेत याची व्यथा निवेदनाद्वारे मांडून महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या कुटूंबाना मार्च ते लाॅकडाऊन संपेपर्यंत पाच हजार रुपयेची मदत करावी अशी विनंती करण्यात आली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा 8 मे रोजी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार, सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले, यांनाही पत्र पाठवून महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना मदत अशी विनंती करण्यात आली आहे.
शासनाने मार्च पासून ते लाॅकडाउन संपेपर्यंत सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या कुटुंबांना प्रति महिना पाच हजार रूपयेची मदत जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व कलाकार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कलाकार संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिला आहे.
