तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

कोरोना विषाणूने राज्यामध्ये धुमाकूळ घातला असुन मुंबई, पुणे या शहरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तुळजापुर तालुक्यातील अनेक खेडेगावांमधुन नोकरीसाठी पुणे ,मुंबई येथे गेलेले नागरीक आपल्या कुटुंबासह कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावी परतत असल्याने गावागावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

     कोराना या जिवघेण्या विषाणू चा कहर देशासह राज्यामध्ये झपाट्याने फैलावत आहे.राज्यातील मुंबई,पुणे,औरंगाबाद,मालेगाव,सोलापूर अशा अनेक शहरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.राज्यात मोठी अर्थिक उलाढाल होत असलेली मुंबई कोरोनाच्या संसर्गाने ठप्प झाली आहे.गेली साठ दिवसांपासून काम नसल्याने व खायचे वांदे होत असल्याने या कोरोनाच्या भीतीने लाखो परप्रांतीयानी गावचा रस्ता धरला.आपल्या  राज्यातील विविध जिल्ह्यातील मुंबई,पुणे येथील नोकरीसाठी गेलेले नागरीकही आपल्या कुटुंबासह मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत.मुंबई ,पुणे या शहरामधुन अनेक कुटुंबीय तुळजापुर तालुक्यातील अनेक गावामध्ये रातोरात येत असल्याने गावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावी आल्यानंतर काहीजण स्वतःहुन क्वारंटाईन होत आहेत परंतु काहीजण तपासणी न करताच तसेच घरामध्ये बसत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग निर्माण होण्याचा धोका आहे.अशा गपचीप येऊन घरामध्ये बसणार्या लोकांची नावे तेथील सरपंच,पोलिस पाटील,उपसरपंच,सदस्य यानी प्रशासनास कळवावी जेणेकरून गावास होणारा कोरोनाचा धोका टळेल.परंतु अनेक गावामध्ये असे होताना दिसत नाही तर काही गावामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकजण अशा लोकांना काय होतयं म्हणुन पाठीशी घालत असल्याचीही चर्चा होत आहे.हा विषाणू कधी,कुठुन,कसा आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही व काही गावामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावरचा कारभार ढिला असल्याने या कोरोनाच्या भीतीने पुणे,मुंबई येथुन गावी परतत असलेल्या लोकांमुळे गावातील जनता घाबरली असुन जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top