उस्मानाबाद, दि. २६ :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी ता . तुळजापूर येथील विद्यार्थी सन 2019 - 20 मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी एकूण सात मुले बसले होते. सर्व मुले पास झाली .त्यापैकी इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चिरंजीव आर्यन अमोल शिंदे हा श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उस्मानाबाद केंद्रात पाचवा आला आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर ,उपाध्यक्ष अमोल शिंदे, ग्रामपंचायतचे सरपंच सौ मीनाताई शिंदे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्‍मण सरडे ,राधा क्षीरसागर , माजी अध्यक्ष पांडूरंग पवार ,हनुमंत शिंदे ,भरत क्षीरसागर यांनी अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके व सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर यांनी  मार्गदर्शन केले.
 
Top