तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर  दि.१७ मार्च २०२० पासुन बंद आहे. सध्या में माहिन्यात लग्न सराई असल्यामुळे कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने विवाह सभारंभ होत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात अगदी साध्या पद्धतीने प्रशासनाच्या आदेशानुसार विवाह सभारंभ करण्यात आले आहेत. माञ श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन सुखी जिवनाची वाटचाल करण्यासाठी आपल्या प्रथा परंपरा जतन करीत आजही श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची धडपड आजही कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील कांही मोजकीच नवदापत्यं मंडळी दि.२६ मंगळवार रोजी जोडीने मोटार सायकल वरती येऊन  वावर जञा करुन श्री तुळजा भवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वार असलेल्या बाहेरूनच श्री देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या सुखी संसाराची वाटचाल करीत असल्याचे दिसुन आले. 

सध्या तीर्थ क्षेत्र तुळजापूर कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन आहे.संपुर्ण शहर बंद आहे. माञ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान प्रशासना ने दिलेल्या आस्थापना असलेल्या दुकाना ना परवानगी देण्यात आली. या काळात श्री तुळजाई नगरीत श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत नवविवाहीत जोडपी मोटार सायकल वर येऊन बाहेरुनच श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत माथा टेकवून जात असल्याचे निर्दशनास येत आहे.
 
Top