तुळजापूर : कुमार नाईकवाडी
कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांनी मोठ्या संख्येने आपापल्या घरूनच सहभागी झाले.उस्मानाबाद जिल्हा जुक्टाचे अध्यक्ष प्रा. रमेश ननवरे, आणि सचिव प्रा. प्रशांत भागवत व अनेक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबीत व कोरोनाच्या परिस्थीती मध्ये विनाअनुदान शिक्षकांवर उपासमारी व आत्महत्येची वेळ आली आहे , राज्य जुकटा महासंघाकडून सातत्याने पाठपुरावा शासनस्तरावर चालू आहे मात्र जी दिरंगाई होत आहे त्याकडे या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
प्रमुख मागण्या :-
*1) राज्यातील मूल्यांकन पात्र घोषित/,अघोषित उच्च माध्यमिक तुकड्यांना 11 मार्च 2020 च्या वित्त विभागाच्या मंजुररीनुसार अनुदान घोषित करणेकामी तात्काळ शासनादेश निगर्मीत करावा*
*2)सन 2003-04 पासून2017-18 पर्यंत च्या वाढीव व व्यपंगत पदांना मंजुरी देऊन त्यावर कार्यरत शिक्षकांना वेतन मिळणे कामी आदेश निगर्मीत करावेत*
*3) 2मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे*
*4)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोनच्या पार्श्वभूमीवर अशैक्षणिक कामे देऊ नयेत*
या संदर्भतील निवेदन जिल्हाधिकारी साहेब, उस्मानाबाद यांना इमेल च्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे.
