तुळजापूर : कुमार नाईकवाडी
मौजे नांदुसा ता.जि.हिंगोली व इटकळ ता.तुळजापूर येथील निंदनीय घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करुन आरोपींना कडक शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन दि.२६ मंगळवार रोजी तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आले.
रिपाई च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, मौजे नांदूसा ता.जि.हिंगोली येथील बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीस गावातीलच एका इसमाने घर जागेच्या कारणावरून मनात राग धरून गळा चिरून जिवंत ठार मारले आहे. तरइटकळ ता.तुळजापूर येथे रात्रीच्या वेळेस बौद्ध समाजातील एका महिलेच्या घरात घुसून एकाने विनयभंग केला असून सदर दोन्ही घटना ह्या निंदनीय असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. या दोन्ही घटणेचा रिपाइंच्या वतीने निषेध करण्यात येत असून दोन्ही घटणेतील आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,रिपाइंचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब मस्के, रिपाइं तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
