तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर (खुर्द) प्रभाग क्र 1 मधील राहणाऱ्या नागरीकाना कोरोना च्या पार्श्वभूमीवर दि.२६ मंगळवार रोजी प्रतिकार शक्तीच्या गोळ्याचे वाटप करण्यात आले.
या मध्ये तुळजापूर खुर्द, गोपाळ नगर, सारा गौरव ,गवते प्लॉटिंग, नागने प्लॉटिंग, नेताजी नगर, शिवरत्न नगर, पारधी वस्ती आदीसह भागात थर्मामीटर स्कॅनींग तसेंच ऑक्सिमीटर तपासणी नंतर होम कोरनटाईन व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना Arsenic Album अर्सेनिक अल्बम (रोग प्रतिकारक शक्ती) वाढीच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या.
या वेळी नगर सेविका सौं मंजुषा ताई, प्रसाद देशमाने, नगर सेवक पंडितराव जगदाळे, राजेभाऊ देशमाने, समनव्यक अधिकारी व्ही व्ही पाठक, मोटे टी डी, मायक्रो सर्वेवर भोजने पी डी, सहसर्व्हे साळूंके बालाजी उपस्थित होते. विशेष या प्रभात जन्तुनाशक फवारणी वेळो वेळी करण्यात आल्या आहेत.

