मुरूम, दि. २६  : येथील किसान चौकात राहणाऱ्या किशाबाई श्रीरंग जाधव यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी (ता.२६) रात्री एकच्या सुमारास लातूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावरती सार्वजनिक स्मशान भूमीत मंगळवारी (ता.२६) रोजी सकाळी ११ वाजता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या.
 
Top