अणदूर, दि. ०९ :

श्री श्री गुरुकुल व कै. डॉ.गुरुनाथ कानडे चॅरिटेबल ट्रष्ट अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही चित्रकला स्पर्धा तीन गटामध्ये होणार आहे.पहिल्या गटात पहीली ते चौथी,दुसऱ्या गटात पाचवी ते सातवी तर तिसऱ्या गटात आठवी ते दहावी वर्गाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.विद्यार्थ्यानी कोरोना कालावधी चालू असताना किंवा कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपायोजना व काळजी घेण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत किंवा केले पाहिजे हे चित्रातुन स्पष्ट झाले पाहिजे.यासाठी प्रथम पारितोषिक पाचशे एक रुपये.द्वितीय पारितोषिक तीनशे एक्कावन रुपये.तृतीय पारितोषिक दोन शे ऐक्कावन रुपये.उतेजनार्थ एकशे एक रुपये बक्षिसासह सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

सहभागी विद्यार्थी एका पेक्षा अधिक चित्र पाठवू शकतो. विद्यार्थ्यांनी चित्राच्या खालील उजव्या कोपऱ्यात स्वतःचे नाव, शाळेचे नाव,वर्ग व मोबाईल नंबर लिहणे आवश्यक आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिनांक 12 मे रोजी रात्री 7 वाजेपर्यंत फोटो पाठवावे.स्पर्धेचा निकाल 15 मे ला जाहीर होईल व विजेत्या विद्यार्थ्याचे पारितोषिक त्यांच्या खात्या वरती ऑनलाइन पाठवण्यात येईल.चित्र काढण्यासाठी A4 आकाराचा कागद असावा.वाटर कलर,स्केच पेन,रंग खडू,रंग पेटी आदी सह इतर रंगांचा वापर करू शकता.चित्र पाठवण्यासाठी व अधिक माहितीसाठी लक्ष्मण नरे 9922297320,अर्जुन सोनटक्के 7020203994 या मो.नंबर वरती संपर्क करावे असे आवाहन श्री श्री गुरुकुल अणदूर व कै.डॉ गुरुनाथ कानडे चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे यांनी केले आहे.
 
Top