उस्मानाबाद, दि. 09 :
आठवड्यातील सहा दिवस उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने अस्थापना सोमवार ते शनिवार रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस ठराविक वेळेत दुकाने खुली करण्यास यापूर्वी प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यात फेरबदल करून यापुढे सोमवार ते शनिवार रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी आज दिनांक ९ मे रोजी दिला आहे.