तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 कोरोना वायरसमुळे श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिक व पुजारी यांच्या उपजिवीकेसाठी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी किराणा किट उपलब्ध करुन देण्यात यावे.अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर नगरपरिषद मार्फत नगरीचे नगराध्यक्ष सचिन(भैय्या) रोचकरी यांनी दि.१५ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आले. 

मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की,तुळजापुर शहरातील मुख्य व्यवसाय हा याञेचा आहे श्री तुळजा भवानी मंदीर गेल्या दोन माहिन्यापासुन बंद असल्यामुळे येथील ७० टक्के नागरीकावंर व त्यांच्या कुंटुबावर उपासमारीची वेळ आली आहे तुळजापुर शहर गेल्या दोन माहिन्यापासुन लाँकडाँऊन असल्यामुळे शहरात वास्तव्यास असणारे पुजारी व छोटे ,छोटे  व्यावसायिक तसेच मध्यम वर्गीय कुंटुब यांना कौटुंबिक उपजिवीकेसाठी अधाराची आवश्यकता आहे तरी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान कडून वाटप करण्यात येणारे ५००० किट हे संपुर्ण तुळजापुर शहरातील गरजवंत नागरीकांसाठी  पुजारी बांधवाना देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे या निवेदनावर मा.नगराध्यक्ष सचिन(भैय्या) रोचकरी यांची स्वाक्षरी आहे.
 
Top