तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 कोरोना विरुध्दचा लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांन इतकाच शेतकरी वर्ग ही कोरोना योध्दा म्हणून लढत असल्याने कोरोना विरोधात लढणा-या या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शनिवार दि16रोजी सकाळी नऊ वाजता हाती कृषी अवजारे घेवुन उभे राहुन शेतकऱ्यांचा ही सन्मान करण्याचे आवाहन  स्वाभीमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले आहे.

  सकाळी नऊ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार देशात कोरोना  महामारी चे संकट आलेला आहे या संकटामध्ये सगळा देश थांबला माञ शेतकरी वर्ग थांबला नाही देश वासियांना अन्न भाज्या मिळावे म्हणून जीव धोक्यात घालुन गावोगावी काम करीत राहीला.

आपल्यासाठी काम करणाऱ्या या कोरोना योध्दाचा सन्मान करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर येऊन शेतीअवजारे आपल्या हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी जिल्हा वासीयांना केले आहे.
 
Top