तुळजापूर, दि. 06 : तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल- अमोल भोपळे दि. 06.05.2020 रोजी 00.15 वा. सु. तुळजापूर शहरात मोटारसायकल गस्त करीत होते. यावेळी योगेश अचित देवकर रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर हा नाका- तोंडास मास्क न बांधता, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन विनाक्रमांकाच्या मो.सा. वर फिरत होता. यावर पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपळे यांनी त्यास हटकले असता त्याने जवळचा स्टिल डबा त्यांच्या डोक्यात मारुन, धक्काबुक्की करुन अंधाराचा फायदा घेउन पळुन गेला. अशा प्रकारे वरील आरोपीने लोकसेवकाच्या (पोलीसाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला. अशा मजकुराच्या पो.कॉ- अमोल भोपळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुद भा.दं.वि. कलम- 353, 333, 332, 188, 269 सह, साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
