नळदुर्ग, दि. ०६ :

 बुधवार दि.६ रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथिल कुरेशी गल्लीत असंख्य जनावरांच्या कत्तली होत असल्याची  माहीती मिळताच उस्मानाबाद जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नळदुर्ग पोलीसांनी संयुक्तपणे  कारवाई केली.  लाखो रुपयाचे मांस व जिवंत  विस जनावरे जप्त केली. यावेळी जनावराची कत्तल करणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली आहे .या कारवाईमुळे मांस विक्री करणाऱ्याचे  धाबे दणणले आहेत.

मुस्ताक चाॅदसाब कुरेशी, महेबुब सादीक कुरेशी, रजाक चाॅदसाब कुरेशी, बशीर चाॅदसाब कुरेशी,  सादीक अब्दुल सत्तार कुरेशी, मुनीर नाशीर कुरेशी, शब्बीर अब्दुलअजीज कुरेशी, मुदतसर गफार कुरेशी (सर्व रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.  नळदुर्ग हे  महामार्गावरील शहर असुन जनावरांची कत्तल करून मांस राज्यासह अन्यठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. बुधवार  दि. ६  एप्रिल  रोजी शहरातील कुरेशी गल्ली येथे मोठया प्रमाणात जनावरांची कत्तल होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली.

जिल्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पालवे,  स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक  मनोहर  वानखेडे ,  सपोनी आनिल खोडेवाड ,  कैलाश लहाने , रोकडे , दाहिहंडे , सावंत , बलदेव ठाकुर ,लाव्हारे पाटील यांनी नळदुर्ग पोलीसांच्या मदतीने पहाटे ४ च्या सुमारास कुरेशी गल्लीत छापा टाकला . यावेळी कत्तलीसाठी आणलेली २० जिवंत जनावरासह    मांस व कटईचे साहित्य असा ५ लाख ८९ हजार २५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला . स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आनिल खोडेवाड यांच्या  फिर्यादीवरून आरोपी महेबुब सादीक कुरेशी व इतर सात जणांविरूध्द प्राणी संरक्षण अधिनिमम कलम ५( अ ) , ९ ( अ ) , १८८ , २६९ भादवी तसेच आपत्ती व्यवस्थापन कलम ५१ ब व न प अधिनियम २६ प्रमाणे नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.


 
Top