मुरुम, दि.१३ :

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील शिंदे गल्लीतील मुळचे पण सध्या हिमाचल प्रदेशामध्ये अभियंता पदावर कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सिद्राम शिंदे यांची कन्या कुमारी ऐश्वर्या शिंदे हीने बी.टेक.कॅम्प्युटर इंजिनिअर उत्तीर्ण असून तिचा गुरुवारी(ता.१४)रोजी वाढदिवस आहे. परवाच जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून व सध्या निर्माण झालेल्या कोरोना संकटामध्ये आपणही मदत केली पाहिजे.माझा वाढदिवस पुन्हाही साजरा करता येऊ शकतो पण सध्याचे हे संकट खुप मोठे आहे.दिवसेंदिवस रुग्णांची यात भरच पडत आहे.मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.या उद्येशाने मी हा निर्णय घेतला की, माझ्या वाढदिवसाला जो खर्च होणार आहे. तो खर्च मी गरजूंच्या मदतीसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे ठरविले आणि पाच हजार रुपयाची रक्कम एक दिवस अगोदरच ऑनलाईनने  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमाही केली.

तिचे वडीलही सतत कुठल्याना कुठल्या माध्यमातून गरजूंना मदत करत असतात.तोच वडीलांचा आदर्श घेऊन ऐश्वर्याने मदतीचा हात पुढे करु सामाजिक बांधिलकीचे भान काय असते याची समाजालाही व तरुण पिढीला आठवण करून दिली आहे. तरुण पिढी या वयात शान-शोक व मौज-मजा करण्यात व्यस्त असते.वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो रुपयाची उधळपट्टी केली जाते.श्रीमंत व्यक्तीना तर पैसे कुठे खर्च करावेत याचे भान नसते पण या वयात समाजाप्रती कृतज्ञता भाव निर्माण होणे खुप दुर्मिळ गोष्ट होत चाललेले असताना या मुलीने खऱ्या अर्थाने संत वीरशैव कैक्कय्या महाराजांनी प्रतिकुल काळात जे समाज उपयोगी कार्य केले.त्यांची आठवण ठेवून आपणही या महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालविणे गरजेचे असल्याची भूमिकाही तीने यावेळी व्यक्त केली.तीच्या या विचाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.समाज बांधवांनीही तीचे विशेष अभिनंदन करून तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
Top