तुळजापूर, दि. १३ :

लोकमंगल मल्टीस्टेट च्या वतीने परिचारिका दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील विविध गावातील परिचारिकांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सध्या कोरोना ची महामारी सुरू आहे या काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांचा लोकमंगल मल्टी स्टेटच्या चे चेअरमन मा.श्री. रोहन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शाखेतील कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. यावेळी लोकमंगल स्टेटच्या तुळजापूर, काकंब्रा,  मंगरूळ,  आरळी,  तामलवाडी,  सावरगाव काटी,  नळदुर्ग,  जळकोट, इटकळ, अणदूर, काटगाव आदी अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल मधील सर्व नर्सचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी यांच्यासह सर्व शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top