तुळजापूर, दि. 13 : कुमार नाईकवाडी
तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांचे तीन महिनाचे घरगुती विज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तुळजापूर तालुका भाजपा मीडिया विभागाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याद्वारे देण्यात आले. सदरील निवेदन हे बुधवार दिनांक १३ मे रोजी देण्यात आले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, सध्या देशासह राज्यात कोरोना या रोगाने थैमान घातले असून गेल्या तीन महिन्यापासून सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यासह सर्वसामान्य माणसावर मोठे संकट उभा आहे. गेल्या तीन महिन्यापासून तुळजापूर शहरातील छोटे व्यवसायदार, खाजगी नोकरदार तसेच फेरीवाले व्यवसाय करणारे यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर खाण्या-पिण्याची संकट निर्माण झाले असून तरी या संघटना त्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या घरातील विज बिल तीन महिन्याचे माफ करावे अशी विनंती भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका मीडिया विभाग यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरुद, तालुका सोशल मीडिया संघटक सागर पारडे, शहराध्यक्ष सागर कदम, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शेटे आदी जणांच्या स्वाक्षर्या आहे.