तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

कोविड  - १९ या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यामध्ये लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला व विवाह सोहळे लांबणीवर गेल्याने अनेकांची घोर निराशा झाली परंतु प्रशासनाच्या वतीने नियमांचे बंधने घालुन घरच्या घरी विवाहकार्य करण्यास प्रशासनाने परवानगी दिली.असाच एक अनोखा शिवविवाह सोहळा दि.१२ रोजी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत नऊ व्यक्तींच्या उपस्थितीत सुरतगाव ता.तुळजापुर येथील हाॅटेल सत्यम येथे पार पडला.

     कोविड  - १९ या विषाणुच्या संसर्गाने जगासह देश,राज्यांना सळो की पळो करून सोडले आहे.य कोरीनो विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यामध्ये लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आणि सर्व काही बंद करावे लागले.कोरोनामुळे विवाहकार्यही थांबल्याने अनेकजण निराश झाले.परंतु प्रशासनाने नियमांचे बंधने घालुन घरच्या घरी विवाह करण्यास परवानगी दिली व पाच ते दहा व्यक्तींच्या उपस्थित विवाहसोहळे पार पडु लागले.असाच एक शिवविवाह सोहळा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत,सामाजिक अंतर राखून  सुरतगाव येथील हाॅटेल सत्यम येथे दि.१२ रोजी फक्त नऊ व्यक्तींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी वधु - वरानी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन शिवअशिर्वाद घेतले.हाॅटेल सत्यमचे मालक तथा संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक शरद पवार यानी वधु वरास शिवअशिर्वाद देऊन शिवशुभेच्छा दिल्या.कोरोनामुळे जरी हाहाकार उडाला असला तरी जीवन जगण्याचे महत्वही कळाले असुन  भविष्यात असे शिवविवाह सोहळे होणे गरजेचे असल्याचे शरद पवार यानी यावेळी तरूण भारतशी बोलताना सांगितले आहे.

       यावेळी मुलाचे आई ,वडील, भाऊ व मुलीचे आई,वडील,चुलता तर वर्हाडी संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक शरद पवार,महादेव मगर आदी उपस्थित होते.


जिजाऊ सृष्टीस ११ हजाराची मदत 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थित हा शिवविवाह सोहळा पार पडल्याने विवाहसोहळ्यास होणारा मोठा खर्च वाचला असुन या वाचलेल्या खर्चामधुन सिंदखेडराजा येथे जिजाऊसृष्टी साकारण्यात येणार आहे या जिजाऊसृष्टी करता मुलाचे वडील गजेंद्र बागल यानी ११ हजार रूपयाची मदत दिली व संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक शरद पवार यांच्याकडे ती  रोख रक्कम सुपुर्द केली.
 
Top