तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 ग्रीन झोन मधील नियमा नुसार इतर दुकाना प्रमाणे  सलूनची दुकाने उघडू द्या अन्यथा प्रती कुटुंबाला 5 हजार रुपये शासकीय अनुदान देण्याची  मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील  यांच्याकडे  निवेदन द्वारे करण्यात आली आहे. 

 उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याने  लाॅकडाऊन ची अट शिथील करत प्रशासनाने जिल्ह्यातील इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली मात्र अद्याप सलून ची दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.यापूर्वी तहसीलदार व नगराध्यक्ष यांना ही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सलून ची दुकाने उघडू द्या किंवा प्रती कुटुंब 5 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आमदार राणा पाटील यांना दिलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे.यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद पिटु गंगणे, आनंद कंदले,जयंत चौधरी,दामोदर घागरे, बंटी कावरे,रंगनाथ कावरे,शिवाजी सुरवसे,महेंद्र कावरे,नाभिक महामंडळाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
 
Top