तुळजापूर : कुमार नाईकवाडी
सध्या पूर्ण देशात कोरोनामुळे सर्व नागरिक भयभीत झाले असून जो तो आपल्या गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने जात आहे. रविवार दिनांक 17 रोजी तुळजापूर येथील घाटाच्या पायथ्याशी सोलापूर हुन येणाऱ्या ट्रक नंबर एच.आर.73 ए 8177 हा बेंगलोर हुन ७० मजूर घेऊन छत्तीसगढ कडे जात असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी श्री गजानन नेरपगार श्री मिलिंद खानोरे श्री अतुल नांदगावकर श्री प्रशांत भांगे हे सर्व मोटार वाहन निरीक्षक यांनी दुपारी ३ च्या सुमारास हा ट्रक संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना अडवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये सुमारे 70 परप्रांतीय मंजूर या मधुन प्रवास करत होते. त्यांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले .तसेच या मजुरांची हाल होऊ नये म्हणून आरटीओ अधिकारी यांनी त्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय कार्यालयामार्फत केली आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्या गावी एसटी महामंडळाच्या मार्फत बसणे त्यांची रवानगी केली जाणार आहे. असे तुळजापूर आगार प्रमुख दिवटे साहेब व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांनी माहिती दिली. तसेच अशा प्रकारचे अवैद्य वाहतूक करताना वाहन आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
