तुळजापूर, दि. 12 :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून ५००० किट वाटपात गैर प्रकार होऊ नये,पुर्वी वाटप झालेल्या साहित्याची चौकशी करावी ह्या इतर मागण्याचे निवेदन तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे (दि.१२)रोजी मनसे उस्मानाबाद जिल्हा संघटक अमरराजे कदम - परमेश्वर यानी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरात भोपे, पाळकर व उपाध्ये पुजारी,व्यापारी,मंदिरातील सुरक्षा रक्षक,स्वच्छता कर्मचारी व इतरही गरजवंताना किराणा साहित्याचा लाभ पुर्वी घेता आलेला नाही हे वास्तव आहे.पुर्वी तुळजापूर शहरात वाटप केलेल्या साहित्य किट याची चौकशी करावी आणि दोषी व्यक्तीवर कारवाई करुन पुढे असे गैर प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी.साहित्य वाटपासाठी नगर परिषद कार्यालयाकडून बोगस यादी जाईल हे नाकारता येत नाही.त्याचबरोबर सर्वे केल्याचे बोगस दाखवले जाईल,दुसरे हे की,न.प.कार्यालयास सरकारकडून आलेल्या आरोग्य तपासणी मशीन देखील आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या आशिर्वादानेच मिळाल्याचे भासविले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र नव्याने वाटप होणाऱ्या ५००० किराणा साहित्याचे किट महसुल व न.प.चे कर्मचारी मार्फतच वाटप व्हावे,यामध्ये आमदार व नगर सेवक यांचा हस्तक्षेप व्होऊ नये.अन्यथा मनसे आंदोलन करेल अशा इशारा दिला आहे.
निवेदनावर जिल्हा संघटक अमरराजे कदम - परमेश्वर,जिल्हाध्यक्ष विध्यार्थी सेना प्रमोद कदम,शहराध्यक्ष धर्मराज सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
त्यामुळे संबंधीत प्रशासन कोणत्या पध्दतीने वाटपात मार्ग अवलंब करेल हे किट वाटपावेळी समोर येणार आहे.

