काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. (13) रोजी कोरोना रोगाच्या महामारीपासून ग्रामस्थांचे सरंक्षण व्हावे या दृष्टिकोनातून सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून मुंबई स्थित निलेश विनायक शिंदे यांच्या वतीने सरपंच आदेश कोळी आणि त्यांचे आजोबा देवबा धोंडीबा सोनवणे यांच्या हस्ते ग्रामस्थांना येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत प्रातिनिधिक स्वरूपात 15 मास्कचे वाटप करीत उर्वरित एकूण 600 मास्कचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, देवबा धोंडीराम सोनवणे, पत्रकार उमाजी गायकवाड, दत्तात्रय सोनवणे,सुर्यभान हंगरकर, सुर्यकांत सोनवणे, नागनाथ सोनवणे, बाबा सोनवणे, ज्ञानेश्वर गुरव, अनिल शिंदे, प्रशांत सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.