
काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याअनुषंगाने बुधवार दि.(13) रोजी सकाळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरानाच्या अशा संकटकाळात व लॉकडाऊनच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या मार्फत घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्य संख्येनुसार मोफत मास्क व एक सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लाँकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच भामाबाई देवकर, उपसरपंच विठठल गुंड,अण्णासाहेब गुंड,मच्छिंद्र गुंड, विजय देवकर, गजेंद्र बोचरे, राम गुंड,आबा गुंड, दादासाहेब गुंड,भुजंग गुंड, महेश नकाते,पोलीस पाटील प्रविण कुंभार, सन्मानिय सर्व गावातील प्रतिष्ठीत नागरीक,ग्रऻमसेवक बापूराव दराडे,तलाठी आबासाहेब सुरवसे,ग्रामपंचायत कर्मचारी राजकुमार गुंड,सौदागर गुंड,आशा कार्यकर्त्या अलका गुंड,अंगणवाडी कर्मचारी माया बागल,मंगल बोचरे,शितल गुंड आदी उपस्थित होते.