तुळजापूर : कुमार नाईकवाडी

  तुळजापूर शहरातील एका भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी सकाळी  या भागास भेट देऊन पहाणी केली तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  जनतेला घाबरून  न जाण्याचे व घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

 तसेच तहसीलदार सौदागर तांदळे  व न.प. मुख्याधिकारीआशिष लोकरे यांना अधिक सतर्क राहून संबंधित प्रभागातील जनतेला आवश्यकता जीवनावश्यक सुविधा घरपोच पुरवण्याच्या सूचना दिल्या तसेच संबंधित विभागातील कर्मचारी यांना योग्य ते उपाय योजने बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळी  तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, नगरसेवक औदुंबर दादा कदम, विशाल भैया रोचकरी, माऊली भोसले,युवा नेते आनंद कंदले, शांताराम पेदे, श्रीनाथ शिंदे  आदी उपस्थित होते.
 
Top