तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर शहरात कोरोना वायरसचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली. तुळजापुर शहरात पुणे येथुन आलेल्या २१ वर्षीय गर्भवती माहिलेचा कोरोना अहवाल पाँझीटिव आल्याने तुळजापुर येथील प्रशासकीय यंञणा जलद गतीने हलवुन शहरातील एका विवाहित माहिलेसह व त्यांच्या कुंटुबाच्या संपर्कात आलेल्या व वाहन चालकाच्या संपर्कात आलेल्या  शहरातील ३५ नागरीकांना काँरनटाईन करण्यात आले.

या ३५ लोकांना तुळजापुर शहरातील उपजिल्हा रुग्नालयात दाखल केले असता त्या पैकी २३ लोकांचे स्ट्ँब चे नमुने लातुर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शाषकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत.  बाकीच्या १२ लोकांना व इतर २३ जनाना  तुळजापुर येथील श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान च्या १०८ भक्त  निवास या ठिकाणी होम क्वाँरनटाईन करण्यात आले आहेत.

या बाबत सविस्तर वृत असे की तुळजापुर शहरातील एका भागात राहणारी गर्भवती माहिला आपंल्या कुंटुबासह दि.१७ में रोजी पुणे येथुन शहरात आली होती. संबंधित माहिलेचा स्ट्ँब त्याच दिवशी घेण्यात आला होता मंगळवारी दि.१९ मध्यराञीनंतर अहवाल प्राप्त झाला .या संदर्भात येथील उपजिल्हा रुग्नालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाँ चंचला बोडके यांनी सांगितले की, तुळजापुर येथील एका भागात राहणारी गर्भवती माहिला आपल्या कुंटुबा सोबत पुण्याहुन तुळजापुर आली होती श.आल्यानंतर त्यांना होम क्वाँरनटाईन करण्यात आले. माञ मंगळवारी मध्यराञी नंतर सदरील गर्भवती माहिलेचा अहवाल प्राप्त झाला सदरील माहिलेस पुण्याहुन आणणारा वाहन चालक तसेच माहिलेंच्या कुंटुबासह वाहन चालकांच्या नातेवाईवाना आय सोलशन कक्षात राञीच दाखल करण्यात आल्याचे सांगितले. या बाबतीत  मंगळवारी मध्यराञी नंतर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक डाँ चंचला बोडके उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तहसीलदार सौदागर तांदळे नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्याधिकारी आशिष लोकरे आदीसह सर्वच विभागाच्या अधिकारी ,कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेऊन रातो रात संपर्कात आलेल्या लोकांना येथील उपजिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले.त्या भागातील सर्वच रस्ते रातो रात न.प.मार्फत रस्ते  बँरिकेट्स लावुन सिल करण्यात आले. 

बुधवारीश कोरोना वायरस ची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन झाल्याने थोडी शिथिलता आणली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते २ या कालावधीत आस्थापना दुकाने खुली करण्यात आली होती. माञ बुधवारी सकाळी कोरोना वायरस ची बातमी पसरताच शहरातील आस्थापनातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी शहरात गल्लो गल्लीतील रस्ते स्थानिक तरुण युवकांनी आपल्या भागातील सर्वच रस्ते अडवुन बँरिकेट्स लोखंडी अँगल लावुन बंद करण्यात आली होती .
 
Top