उस्मानाबाद, दि.18 (जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणू (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे, करोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उस्मानाबाद व तुळजापुर नगर पालिका क्षेत्रात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिनांक 31 मे 2020 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद यांनी (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद व तुळजापुर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून.
1.शासकीय/निमशासकीय कार्यालये.
2. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना.
3. सर्व बँका.
4. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना.
5.अन्न, भाजीपाला, दूध.
6. किराणा पुरविणाऱ्या आस्थापना.(सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहतील.)
7. दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने.
8. विद्युत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने.
9. प्रसार माध्यमे, मीडिया.
10.अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना.
वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद व तुळजापुर नगर पालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 31 मे 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित करीत आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी तहसिलदार उस्मानाबाद व तुळजापुर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन अधिकारी न.पा.प्र.जि.का.उस्मानाबाद, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मुख्याधिकारी नगर परिषद त्तुळजापुर व उस्मानाबाद, तुळजापूर व उस्मानाबाद शहरातील मंडळ अधिकारी, तलाठी इत्यादींची असेल.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच उपरोक्त वाचा क्रमांक 2 मधील महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 20 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
