मुरुम, दि.२० : संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.या प्रसंगी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै.माधवराव(काका)पाटील यांची १८ वी पुण्यतिथी मुरुम शहरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या समाधी स्थळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै.माधवराव पाटील यांच्या पुर्णावृती पुतळ्यास मंगळवार (ता.२०)रोजी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, प्राचार्य काशीनाथ मिरगाळे,परमेश्वर ढंगे,महादेव जिडगे,डॉ.महेश मोटे,मुख्याध्यापिका अनुराधा जोशी,काकासाहेब पाटील,अशोक कलशेट्टी,प्रविण गायकवाड,डॉ.चंद्रकात जावळे,डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा.आण्णाराव कांबळे,प्रा.लक्ष्मण पवार,प्रा.दयानंद राठोड,आनंद मुदकण्णा,राजू ढगे,सुभाष वैरागकर,शिवानंद पाटील,महावीर नारायणकर,भालचंद्र टाचले,महादेव पाटील,शिवपुत्र सोलापूरे,राजू कोळी,महेश लिमये,व्यंकट मंडले आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.शहरातील कै.माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय,प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम,कोथळी,भुसणी व नूतन विद्यालय,मुरुम आदी ठिकाणी कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली.
