• उस्मानाबाद : मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १६ वर पोहचली असून यातील तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


पॉझिटिव्ह रुग्णामध्ये परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 व्यक्ती, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक  मुलगा, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूरची 1 महिला  व उस्मानाबाद शहरातील  एका तरुणाचा समावेश आहे.  यातील तुळजापूरची महिला ही पुण्या वरून आलेली असून  इतर सगळेजण हे  मुबंई वरून आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्हयात आल्या नंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाईन करण्यात आहे होते. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 19 मे रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
 
Top