तुळजापूर, दि. १९ : कुमार नाईकवाडी

तुळजापूर शहरातील जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके यांनी एका वृध्द निराधार महिलेची निवारा व अन्नधान्याची सोय केली आहे. याची माहिती त्यांनी नायब तहसिलदार जाधव यांना कळविले आहे.

 वृध्द महिला श्रीमती रुक्मिण रामभाऊ कोरे यांना जिजामाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष मधुकर शेळके यांनी स्वता च्या मौजे कांक्रबा येथील पत्राच्या शेठ मध्ये राहाण्याचा निवारा सोय करुन किराणा माल देऊन आधार दिला. यावेळी कांक्राबाचे उपसंरपच शुंभागी मेघराज सांबळे, भरत इंगळे महादेव शिरगिकरे, आप्पा कोरे, कलिम शेख, राम विभुत्ते, मेघराज साबळे आदींजण उपस्थित होते.
 
Top