तुळजापूर, दि. 14 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वांचे मार्च 2020 ते आँगस्ट 2020 पर्यंतचे सर्व घरपटटी व नळपटटी माफ करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्यावतीने न.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
कोरोना विषाणू सध्या जगभर पसरला आहे. महाराष्ट्र राज्यात ही कोरोनाचे बराच प्रादुर्भाव आहे. त्यामुळे देशात व राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे. यामध्ये तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर बंद आहे. त्यामुळे शहरातील पुजारी, व्यापारी व इतर सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंदीरावर अवलंबून असलेले सर्व पुजारी, छोटे-मोठे दुकानदारर, गोरगरीब नागरीक हे चैत्रीचे उत्पन्न न मिळाल्याने घरपटटी व नळपटटी भरु शकत नाही त्यामुळे तुळजापूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत असलेले मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे सर्व शासकीय कर म्हणजे नळपटटी, घरपटटी व इतर सर्व कर माफ करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदरील निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार, शहरप्रमुख, सुधीर कदम, उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदनाची एक प्रत माहितीस्तव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.