ताज्या घडामोडी


तुळजापूर, दि. 14 : राज्यात कोरोना या वायरने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व उदयोग धंदे, व्यापार बंद झाले आहेत. त्यामुळे कामगार, नौकरदार वर्ग, कर्मचारी, छोटे व्यापारी या सर्वांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे घरगुती वापराचे संपूर्ण वीज बिल करावे, अशी मागणी निवेदनादवारे शेतकरी कामगार पक्ष तुळजापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तहसिलदार तुळजापूर यांच्या द्वारे करण्यात आली आहे.

कोरोना या महामारीमुळे राज्यातील नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे बरेच उदयोग धंदे बंद पडल्याने कामगार व सर्वसामान्य नागरिकांना रोजगारास मुकावे लागत आहे. त्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लहान व्यापा-यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती वापराचे संपुर्ण वीज बील माफ करण्यात यावे, जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला आर्थिक दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 या निवेदनावर उत्तम अमृतरावर, नगरसेवक राहूल खपले, श्रेयस कुतवळ, उमेश भिसे, नवनाथ जगताप, रामहरी जाधव आदींच्या स्वाक्ष-या आहे.
 
Top