बेंबळी, दि. २४ : पविञ रमजान महिन्यात सर्व मुस्लीम बांधवांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत पविञ रमजान महिन्यातील रोजा (उपवास)घरी राहून केले. तसेच नमाज प्रार्थना ही घरी राहून केली त्याच पध्दतीत रमजान ईद ही साध्या पध्दतीत साजरी करावी,देशात कोराना आजाराचे थैमान असून रमजान ईद च्या नमाज मध्ये कोरोना सारखा संसर्ग जन्य आजार नष्ट व्हावा म्हणून देवाला प्रार्थना करावी तसेच रमजान ईद हा पविञ सण हिंदू मुस्लीम बांधवांच्या ऐक्याचा सण आहे. बहूतांश प्रमाणात हिंदू बांधव ही रोजे करतात. या एकोपा असलेल्या सण उत्सवात गरजूंना मदत करावी तसेच दानधर्म करावे मार्केट मध्ये खरेदी न करता सामान्य पध्दतीने सण साजरा करावा सर्वांनी अल्लाकडे प्रार्थना करून देशावरील संकट लवकर संपुष्टात यावे यासाठी अल्लाकडे प्रार्थना करावी असे आवाहन बेंबळी येथील काँग्रेसचे युवा नेते सद्दाम शेख यांनी तुळजापूर लाईव्ह शी बोलताना केले.

 
Top