तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 येथील समाजसेवेचा वसा घेतलेले युवा नेते ऋषी मगर व विनोद गंगणे यांच्या परिवाराच्या वतीने शहरातील गोरगरीब गरजवंताना दि.८ शुक्रवार रोजी  तुळजापुर शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ अर्चना विनोद गंगणे यांच्या हस्ते १०० किट किराणा मालाचे साहित्य वाटप करण्यात आले.

 या मध्ये युवा नेते  ऋषी मगर यांच्या कडून 30  किराणा किट व व युवा नेतृत्व विनोद गंगणे यांच्या कुटुंबाकडून 70  किट असे मिळून 100 किट चे वाटप  शहरातील गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले. सध्या तुळजापुर शहरात कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर तुळजापुर शहर लाँकडाँऊन आहे त्यामुळे सर्व सामान्य गोर गरीबांचे हातवर पोट असल्यामुळे शहरातील गोर गरीबांची उपासमार होत असल्यामुळे मगर व गंगणे परिवाराकडून या गरीबांना मोफत किराणा मालाचे किट दिल्यामुळे या गोर गरीबातुन गंगणे व मगर परिवारानी दिलेल्या मदतीचा हात यामुळे शहरात गोर गरीबातुन कौतुक होत आहे.
 
Top