तुळजापूर, दि. ०८ :
शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे परजिल्ह्यातून किंवा कोरोना पेशंटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे तपासणी करण्यासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन टाईम करण्यात आलेले आहे. उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात पेशंटची हेळसांड होत आहे जे पेशंट रुग्णालयामध्ये आहेत त्यांची व्यवस्थित देखरेख करण्यात येत नाही. त्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना जेवणाचा डब्बा वेळेवर देण्यात येत नाही त्यामुळे पेशंटवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी त्यांना जेवण्याची व्यवस्था वेळेवर करण्यात यावी व त्यांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी प्रहारचे तुळजापूर उपतालुका प्रमुख जुबेर शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे ज्या ठिकाणी पेशंटला ठेवण्यात आले आहे त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे पेशंटला दुसऱ्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुगांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी शेख यांनी तुळजापूर ~तहसीलदार~ यांच्याकडे केली आहे.