तुळजापूर : कुमार नाईकवाडी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे तसेच महाराष्ट्रातील जनता लवकरच कोराणा रोगातून मुक्त होवो, यासाठी तुळजापूर येथे शतचंडी यज्ञाचे गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले होते. सदरचा शतचंडी यज्ञ शहरातील घाटशीळच्या पायथ्याशी वसुंधरा सांस्कृतिक सभागृहांमध्ये करण्यातआला होता . या यज्ञाचे आयोजन वसंतराव पाटील व त्यांच्या पत्नी यांच्यावतीने करण्यात आले होते तसेच या यज्ञाचे पूजन यजमान वसंतराव पाटील दाम्पत्याने केले. यावेळी महाविकास आघाडीचे गोकुळ शिंदे, सुधीर कदम, विशाल कोंडो, विजय भोसले इत्यादी उपस्थित होते.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे लवकर कोरणा मुक्त होवो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो तसेच महाराष्ट्र राज्यावरील आलेले कोरणाचे संकट लवकर दूर होवो, या मागणीसाठी या शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते असे शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम यांनी सांगितले.
