तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 नगर परिषदेची  सर्वसाधारण सभा दिनांक 28  मे  गुरुवार रोजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .या सर्वसाधारण सभेत मागील 13 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील बारा विषयांवर चर्चा होऊन त्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे ,तर 23 मार्च रोजी तहकूब करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील एकूण 40 विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली.
      
     लेखा विभागाने जानेवारी महिन्यापासून काढलेल्या बिलास मान्यता देण्यात आली. रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत सन 2019 - 20 मधील 45 लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली. शहरातील मुख्य चौकातील पाच ठिकाणच्या सिग्नलच्या देखभाल व दुरुस्ती साहित्य वापरून कामाच्या प्राप्त  निविदेस व इतर विविध विषयांच्या निविदांंना मंजुरी तसेच विविध  विभागातील  वार्षिक निविदा मागविण्यास   मंजुरी देण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधवास शादीखानासाठी जागा उपलब्ध करून देणे ,भाई उद्धवराव पाटील सभाग्रह जागेत वाहनतळ उभारणे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधील शहरातील शौचालयाच्या ठिकाणी दुरुस्ती करणे ,आठवडा बाजार फुटपाथ लिलाव करणे ,जिजामाता कन्या सन्मान योजना लागू करणे, शहरातील कोरोना विषाणू संसर्ग संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना, आरधवाडी व तुळजापूर खुर्द येथील स्मशानभूमी विकसित करणे, पोलीस उपविभागीय अधिकारी तुळजापूर यांनी पोलीस पोलिस चौकी संदर्भात दिलेल्या पत्रावर चर्चा, यासह न प कर्मचारी यांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा होऊन विषय मंजूर करण्यात आले . यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे सभा प्रमुख वैभव अंधारे सभा लिपिक महादेव सोनार व नगरसेवक  उपस्थित होते.
         
 
Top