उस्मानाबाद : तंबाखु- तुबाखुजन्य पदार्थाची विक्रीस मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा बंदी आदेश आहे. असे असतांनाही, 1)प्रशांत पोपट गुजर रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हा दि. 27.05.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील बाजारपेठ येथे तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला. तर, याच दिवशी 2)आशाबाई मस्के रा. कळंब या रंगीला चौक, कळंब येथील आपल्या दुकानात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळल्या. यावरुन वरील दोघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.
 
Top