तामलवाडी : कोविड- 19 चा संसर्ग पसरु नये म्हणुन लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्हयात विनापरवाना प्रवेश करण्यात बंदी आहे. असे असतांनाही प्रशांत शरणप्पा गायकवाड रा. वळसंग, ता. सोलापूर (द.) हे विनापरवाना, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून सोलापूर जिल्ह्यातून दि. 27.05.2020 रोजी मौजे धोत्री, ता. तुळजापूर येथे आले. अशा प्रकारे त्यांनी लॉकडाऊन काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- दत्तात्रय पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.
