तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुरात स्वा वीर सावरकर विचार मंच च्या वतीने दि.२८ गुरुवार रोजी स्वा.वीर सावरकर यांची जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.प्रथम प्रमुख मान्यवराच्या हस्ते स्वा.वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी जेष्ट पञकार अंबादास पोफळे, सावरकर विचार मंच चे बाळासाहेब श्यामराज उमेश गवते,महेश कुलकर्णी ,सचिन सरकाळे आदीसह सावकर विचार मंच सदस्य उपस्थित होते.या वर्षी प्रथमच कोरोना च्या सावटाखाली स्वा.वीर सावरकर जयंती अंत्यत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
