तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने दि.१०,११ व १२ असा तीन दिवस जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला होता परंतु प्रशासनाचा ढिसाळ कारभार व जनतेच्या अताताईपणा यामुळे या जनता कर्फ्युला संमिश्र असा प्रतिसाद मिळालेला दिसुन येत आहे.

       देशासह राज्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका वरचेवर वाढतच असुन या विषाणुचा ग्रामीण भागामध्येही प्रादुर्भाव दिसुन येत आहे.उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला असला तरी शेजारील सोलापुर जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा  अडीचशेच्या पार गेल्याने सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणार्या गावांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे.हा कोरोनाचा धोका लक्षात घेता तामलवाडी ता.तुळजापुर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दि.१०,११,व १२ या तीन दिवशी जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला होता.परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व जनता गांभीर्याने घेत नसल्याने या जनता कर्फ्युला संमिश्र असा प्रतिसाद मिळालेला दिसुन येत आहे. यामधुन गावातील सर्व कारखान्यांना सुट देण्यात आली आहे.काही दुकाने चालु आहेत तर काही नियमांचे पालन करताना दिसत आहेत.जनता रस्त्यावर विनामास्क मुक्त संचार करत आहे.काही ठिकाणी ३० ते ४० तरूण,जाणते प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत,सामाजिक अंतर न ठेवता घोळक्याने एकत्र थांबत आहेत तसेच गावातील अंतर्गत रस्त्याची कामेही चालु असल्याचेही दिसुन येत आहे .काही ग्रामस्थांनी सुरूवातीलाच या जनता कर्फ्युला विरोध दर्शवला होता त्यामुळे या जनता कर्फ्युला संमिश्र असा प्रतिसाद मिळालेला दिसुन येत आहे.गावाला जर कोरोनोपासुन रोखायचे असेल तर गटतट,माझे तुझे,राजकारण, बाजूला ठेऊन सर्वानी एकत्र येऊन लढलो तर आणी तरच आपण या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखु शकतो अन्यथा नाही असे काही जाणकार ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.

गावामध्ये तीसर्यांदा जंतुनाशक फवारणी 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये सुरूवातीला ग्रामपंचायतीच्या वतीने ब्लीचींग पावडरने जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती.परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बालाजी अमाईन्स लि.व ग्रामपंचायतीच्या वतीने परत दोनवेळा हायपोक्लोराईड या जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली असल्याने ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे तसेच हा वाढता धोका लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटाइजरचेही वाटप करावे अशी मागणीही ग्रामस्थांमधुन होत आहे.
 
Top