तुळजापूर : कुमार नाईकवाडी
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेल्या दोन महिन्यापासून शासनाने देशभरात लाँकडाऊन व संचार बंदी, लागु केल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजु कुटुंबाना तुळजापूर येथे रिपाइंच्या नगरसेविका वैशाली तानाजी कदम यांच्या वतीने तर रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ ,जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या हस्ते मोफत धान्य कीटचे वाटप फिजीकली अंतर ठेवून करण्यात आले. यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, बाबा कदम,रिपाइं श्रमिक अघाडीचे तालुका अध्यक्ष आप्पा कदम,गोपाळ सोनवणे, तानजी डावरे, महादेव सोनवणे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ म्हणाले की, दिवसेनदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असून ही एक गंभीर बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी प्रतेकानी काळजी घेणे गरजेचे आहे.
