उस्मानाबाद दि 15 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउन चा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून आता खरीप हंगाम तोंडावर आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना खरिप पेरणी ची चिंता लागली आहे .शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे रासायनिक खते व बी-बियाणे खरेदी करणे अत्यंत कठीण झाले आहे .शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन किंवा प्रवचन देण्यापेक्षा कर्जाच्या ओझ्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खते व बी बियाणे मोफत देण्याची मागणी जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.
