उस्मानाबाद, दि. २९ :
पो.ठा. भुम गु.र.क्र. 72/2014 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- किसन छगन काळे रा. भूम हा गेली सहा वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. त्यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 29.05.2020 रोजी भूम येथील पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी भुम पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, यांच्या पथकाने केली आहे.
