बेंबळी, दि. २९ : 

कोरोनाच्या या लढाईत जिवाची बाजी लावत सर्वात पुढे आम्ही म्हणत लोकांच्या जिवाचे रक्षण करणारे म्हणजे पोलिस डिपार्टमेंट आहे.  गावातील सोशल डीस्टंसीगच्या विषयापासून ते जिल्हा बॉर्डरच्या सुरक्षेपर्यंत 24 तास सेवा देणारे उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलिस स्टेशनचे सपोनि मुस्तफा शेख व त्यांच्या टिमचे कार्य उल्लेखनीय आहे. 

आज शुक्रवार शनिवारी रोजी दक्षता समिती बेंबळी च्या वतीने बेंबळी पोलिस स्टेशन येथे बँटरीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी समीतीचे सदस्य गालिबखान पठाण, अमर कटके, नितीन पाटील, गोवींद पाटील, शाम पाटील,सुनिल वेदपाठक, बालाजी माने, नंदकुमार मानाळे, शितल शिंदे, सोनु निकम उपस्थित होते.
 
Top