तुळजापूर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान कडून कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या संकट काळातील गरजवंत नागरीकांना अन्न धान्य किट वाटपा मध्ये पारदर्शकता असावी कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर कोणीही राज कारन करु नये.अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर येथील महाविकास आघाडीच्या वतीने दि.१८ सोमवार रोजी मा.जिल्हाधिकारी यांना तुळजापुर येथील तहसीलदार मार्फत देण्यात आले.
महा विकास आघाडी च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान कडून येत्या कांही दिवसा मध्ये ५०००/अन्य धान्य किटचे वाटप करणार आहेत मा.जिल्हाधिकारी तथा तु.भ.मं संस्थानच्या अध्यक्षा यांना महाविकास आघाडी च्या वतीने विनंती करण्यात येत आहे की तुळजापुर शहरा मध्ये जे आपण अन्न धान्य वाटप होणार आहे ते किराणा किट तुळजापुरातील गरजवंत पुजारी,व्यापारी ,आणि गोरगरीब बारा व बलुतेदार लोकांना देण्यात यावे दि.२२ मार्च पासुन लाँकडाऊन झाल्यापासुन श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर बंद असल्यामुळे या मध्ये गरजवंत पुजारी,व्यापारी व बारा बलुतेदार यांची उपासमार होत असल्यामुळे याचा लाभ त्यांना व्हावा या उद्देशाने हे अन्न धान्य किट चे वाटप श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान च्या प्रशासकीय यंञणे मार्फत वाटप करावे या कोरोना वायरस च्या संकटप्रसंगी किट वाटपा मध्ये कोणत्याही पक्षाचे व संघटनेचे राजकारणासाठी या गोष्टींचा वापर होऊ देऊ नये अशी विनंती करण्यात आली.
या निवेदनावर रा.काँ चे गोकुळ शिंदे शिवसेनेचे श्याम पवार काँग्रेस चे नगरसेवक अमर मगर शिवसेनेचे सुधीर कदम रा.काँ.चे नितीन(आबा) रोचकरी दुर्गेश सांळुके महेश चोपदार अभय माने शिवसेनेचे सागर(दादा) इंगळे,बापुसाहेब नाईकवाडी,आदीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
