मुरुम, दि. १८ : येथील नगर शिक्षण विकास मंडळ व बापूराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने एक हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट मुख्याधिकारी हेमंत केरूरकर यांच्याकडे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या हस्ते सोमवार (ता.१८)रोजी सुपुर्द करण्यात आले.

यावेळी उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव,नगराध्यक्षा अनिता अंबर,प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपनाराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण,प्रा.राजशेखर दलाल,काकासाहेब पाटील,राजू ढगे,डॉ.भिलसिंग जाधव,सुशील कांबळे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.

 रोजगार हिरावला गेल्यामुळे कोरोनोच्या संकटात गोरगरीब,विशेषत: वृध्द व आजाराने बाधित,विधवा महिला,निराधार,शेतमजूर,रोजंदारी कामगार यांचे अतोनात हाल होत आहेत.त्यामुळे व्यथित झालेल्या शहरातील नगर शिक्षण विकास मंडळ व बापूराव पाटील मित्र मंडळ,मुरूम च्या वतीने एक हजार जीवनावश्यक कीट किमान २५ दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक किराणा वस्तुंच्या किट तयार करून नगर परिषद,मुरूमच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांकडून सात प्रभागनिहाय,१७ वार्डमधील गरजू लोकांना नगरसेवक व कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी जाऊन या कीटचे संसर्गाच्चा धोका टाळण्याकरिता मास्क,हॅडग्लोव्हज आणि सॅनिटायझरचा वापर करून उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,नगरसेवक रशिद शेख,सहदेव गायकवाड,शभुलिंग पाटील,संतोष चिलोबा,आयुब मासुलदार,सिध्दु स्वामी,इब्राहिम नदाफ,सुरेश शेळके,मंगल नारायणकर,विजयश्री भालेराव,सुलभा अंबुसे,ज्योती बन्ने,सुनंदा कुंभार, महानंदा गुंडगुळे,सुमन देडे,फरजाना कोतवाल,महावीर नारायणकर,गणेश अंबर,जाफर मोमीन,रतन बन्ने आदिंनी पुढाकार घेऊन शहरात वाटप करीत आहेत.माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो असे कै. माधवरावजी पाटील उर्फ काका सतत मनायचे.याच विचारांचा वसा आणि वारसा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी हाच माणूसकीचा धर्म जोपासला असून याच भूमिकेतून सतत मदतीचा भाव ठेवण्याचा प्रयत्न हे बंधू करीत आहेत.राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा करून ता.३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे पुढे काय होणार,याची कोणालाही कल्पना नाही.तरीसुद्धा सरकार,प्रशासन आपल्या पातळीवर वेगवेगळी पावले उचलताना दिसत आहे.सदरच्या संचारबंदीच्या काळामध्ये दिव्यांग व वृध्द व्यक्तींची उपासमार होत आहे.सध्या उपासमारीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने किमान आपण जीवनावश्यक वस्तूच्या रुपाने कीटच्या स्वरूपात गरजूंना मदत व्हावी हीच या पाठीमागची भावना आहे.

कीट तयार करण्यासाठी राजू कोळी,प्रभाकर महिंद्रकर,लालअहमद जेवळे,महेश लिमये, इसाली चाऊस,सिद्राम मुळे आदींनी पुढाकार घेतला.
 
Top