भुम, दि. १८ :
1)सागर वनवे रा. आनंदवाडी, ता. भुम 2)कुंडलीक हांगे रा. सोनारी, ता. परंडा 3)मदन मरुमकर रा. त्रिंतज, ता. भुम 4)उमेश वनवे रा. बेदरवाडी, ता. भुम हे सर्व दि. 17.05.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे पाथ्रुड शिवारात भुसुरुंग स्फोट करण्याच्या उद्देशाने महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 6924 सह असलेल्या ट्रेलरमध्ये विनापरवाना, अवैधपणे 210 जिलेटीन कांड्या, 100 डिटोनेटर बाळगलेले असतांना व सोबतच्या दुसऱ्या विनाक्रमांकाच्या स्वराज ट्रॅक्टर- ट्रेलरमध्ये कॉम्प्रेसर मशीनसह भुम पो.ठा. चे पो.नि. श्री. रामेश्वर खनाळ यांच्या पथकास आढळले. अशा मजकुराच्या पो.नि. श्री. रामेश्वर खनाळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द भा.द.वि. कलम- 283 सह, भारतीय स्फोटक कायदा व नियम अंतर्गत गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.
