नळदुर्ग : रणजीत भोईटे रा. किलज, ता. तुळजापूर यांचा विहीरीत पोहतांना गावातीलच भाऊबंदांशी वाद झाला होता. दि. 18.05.2020 रोजी 11.00 वा. रणजीत भोईटे हे गावातीलच आपल्या शेतात भाऊ- रोहीत, पिता- रघुनाथ , आई- रागीणी यांच्यासह काम करत होते. यावेळी बाळु भोईटे, शंकर भोईटे, नागनाथ भोईटे, आशाबाई भोईटे, सुरज भोईटे, सुधीर भोईटे, धनश्री भोईटे यांनी रणजीत भोईटे काम करत असलेल्या शेतात जाउन विहीरीतील पोहतांना झालेल्या भांडणाचा वाद उकरुन काढून रणजीत भोईटे व कुटूंबीयांस शिवीगाळ करुन, दगड फेकून मारुन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत फेकलेला दगड रघुनाथ भोईटे, वय 48 वर्षे, यांच्या डोक्यात लागुन जखमी होउन ते बेशुध्द झाले. तर रणजीत भोईटे स्वत: त्यांचा भाऊ-रोहीत, आई- रागीणी असे जखमी झाले. हा प्रकार पाहुन आकाश भोईटे व प्रशांत भोईटे यांनी मारहाण सोडवली. जखमी रघुनाथ यांस मोटारसायकलवर सलगरा (दि.) येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. अशा मजकुराच्या रोहीत भोईटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
